आंतरराष्ट्रीय

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग

जामनगर : मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स असल्याची माहिती आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथकाच्या तपासानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती गुजरात पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या दूतावासाला मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यांनी लगेच याची माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. त्यानंतर या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दरम्यान, या विमानात २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स असून सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी गुजरात पोलीस, बॉम्ब शोधक पथक तसेच एनएसजी कमांडोही दाखल झाले असल्याची माहिती जामनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरभ पारघी यांनी दिली आहे.

Img 20230110 wa00053052482550557119128
Img 20230109 wa00053626285548501344433
Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये