पुणे शहर

कर्वेनगरमधील मोरया मित्र मंडळाचा उपक्रम प्रेरणादायी :  रमेश परदेशी

कर्वेनगर : छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार मनामनात घराघरात पोहचवणे ही काळाची गरज आहे. गेली वर्षभर लॉक डाऊन काळात लहान मुलांच्या मनावर आलेली मरगळ ही मोरया मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धांमुळे झटकली गेली आहे. असे मत अभिनेते रमेश परदेशी यांनी व्यक्त केले. Motivational initiative of Morya Mitra Mandal in Karvenagar: Ramesh Pardeshi

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंतीनिमित्त मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने  वक्तृत्व ,निबंध, चित्रकला आणि ऐतिहासिक वेशभूषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे सिनेअभिनेते रमेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ होत्या तसेच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विजय डाकले , सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका अनुया सायगावकर, कैलास सरतापे , स्वप्निल बराटे, सागर शिगवण ,संजय औजी ,दादा आठवले , मंगेश नवघणे, गजानन कड ,गिरीश भागवत, ब्रह्मानंद टाक, संदीप शितोळे आदी उपस्थित होते.

IMG 20210522 WA0203

या घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये वत्कृत्व स्पर्धेत  उस्मानाबाद जिल्ह्यातील सोहम पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूजा बोवलेकर व  नगर जिल्ह्यातील स्नेहल जोशी यांना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. १४ वर्षाखालील वत्कृत्व स्पर्धेमध्ये मंदार पेंडसे प्रथम, सई शिखरे द्वितीय, व भोसरी येथील प्रतीक शिंदे याला तृतीय क्रमांक मिळाला.

निबंध स्पर्धेमध्ये नीता तेरकर हिने प्रथम तर शिरूर तालुक्यातील अथर्व लक्ष्मण ननवरे द्वितीय , रूपाली हिरवे कपडेकर, पांडुरंग दळवी तृतीय व  नेहा माळी हिला चतुर्थ क्रमांक पटकावला.  ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेमध्ये  सांगवी येथील ८ वर्षाच्या शरण्या सुडीत याला प्रथम क्रमांक मिळाला तर कोमल शिंदे व सात वर्षाच्या गौरवी राऊत यांना द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.

चित्रकला स्पर्धेमध्ये नेत्रा नायकवडी, संस्कृती सावंत, हर्षद जावळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.  वेदांत हुले ला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विजय देसाई लिखित शंभू जागर हे पुस्तक देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी आणि संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तक देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मोरया मित्र मंडळाचे संस्थापक केदार मारणे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर मयूर  बनकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये