राष्ट्रीय

मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख होणार

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt gen Manoj Pande) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Chief of the Army) असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपविण्यात येणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. नरवणे यांचा २८ महिन्यांचा कार्यकाळ ३० एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे.

मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनिअर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. मनोज नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एमएम नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.

अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरले (यूके) पदवीधर आहे आणि त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभागी झाले होते.

Fb img 1648963058213
Img 20220418 wa0007
Img 20220418 wa0006

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये