चंद्रकांत मोकाटे यांच्या रॅलीत खासदार सुप्रिया सुळे सहभागी; बाणेर बालेवाडी पाषाण परिसरात रॅलीचे जोरदार स्वागत
पुणे : कोथरूड मतदार संघातील बाणेर, बालेवाडी पाषाण परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी दुचाकीस्वारांची भव्य रॅली आज आयोजित करण्यात आली होती.या रॅलीत खासदार सुप्रिया सुळे बाणेर येथील हॉटेल महाबळेश्वर पासून सहभागी झाल्या. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सुप्रिया सुळे या बाणेर, विधाते वस्तीपासून डी पी रस्त्यावरील आंबेडकर वसाहतीमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅलीत सहभागी झाल्या. डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यासं पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. पाषाण येथील सोमेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन मोकाटे यांच्या रॅलीस सुरुवात झाली सोमेश्वरवाडी, पाषाण, पाषाण गावठाण, बाणेर पाषाण लिंक रोड, सुतारवाडी, बाणेर बालेवाडी, विधाते वस्ती, बालेवाडी गावठाण मार्गे आंबेडकर वसाहत या मार्गाने दुचाकीस्वारांची रॅली काढण्यात आली
या रॅलीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, माजी नगरसेवक चंदू कदम, तानाजी निम्हण, अजय निम्हण,गणपत मुरकुटे, ज्योती चांदेरे, गजानन थरकुडे , दिलीप मुरकुटे, सुनिता रानवडे आदी या रॅलीत सहभागी झाले होते.