महाराष्ट्र

गुड न्यूज! मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बस सुरू

मुंबई : महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या ताफ्यात ई-शिवनेरी दाखल झाल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखदायक आणि आरामदायी होणार आहे. मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० इलेक्ट्रिक शिवनेरी बसेस धावणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

अशी आहेत या बसची वैशिष्ट्ये

संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध असतील. बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असेल. बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. 

प्रदूषणमुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी, बसचा रस्त्यावर धावतांना आवाज नाही, ही बसची अन्य वैशिष्ट्ये आहेत.

तिकीट दर

सध्यातरी ई-शिवनेरीचे तिकीट दर हे ५१५ रुपये इतकेच ठेवण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये