
पुणे : महागाई त्रस्त असणाऱ्या सामान्य माणसाच्या खिशाला आणि पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता आणखी भुर्दंड बसणार आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर आता १८ टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. टोलची नवीन दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
या महामार्गावर अपघातामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात दर तीन वर्षांनी या महामार्गावर टोलचे दर वाढवले जातात. त्यामानाने चांगल्या सुविधा मिळत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दर शनिवार आणि रविवार महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते. टोल वाढवता तर सुविधा देखील तशा पुरवा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वाहन- आताचे दर- १ एप्रिलपासून होणारी वाढ
चारचाकी- २७०- ३२०
टेम्पो- ४२०- ४९५
ट्रक – ५८० – ६८५
बस- ७९७ – ९४०
थ्री एक्सेल- १३८०- १६३०
एम एक्सेल- १८३५- २१६५
