पुणे शहर

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चूनही पाषाण तलावातील जलपर्णीची समस्या सुटेना ; शिवम सुतार यांच्याकडून महापौर, आयुक्तांना निवेदन

पुणे : पाषाण सुतारवाडी येथे जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी महापालिका कोटयावधी रुपये खर्च करत आहे, तरीही जलपर्णी चा प्रश्न अजूनही सुटला नाही आणि या गोष्टीकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यासाठी त्याला पर्याय मार्ग म्हणून त्याठिकाणी मैला पाणी शुध्दीकरण केंद्र (S.T.P.) प्रकल्प बसवण्यात यावे जेणेकरुन तलावाचे पाणी स्वच्छ राहील आणि ते पाणी वापर करण्यात सुद्धा येईल. याबाबतीत स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

IMG 20210622 WA0002

शिवम सुतार म्हणाले, पाषाण तलावात दर वर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठते. महापालिका दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र हि काढलेली जलपर्णी किनाऱ्या वरच ठेवण्यात येते. पावसाच्या पाण्यासोबत ती पुन्हा वाहून येते. या जलपर्णी चे कंपोस्ट खत तयार करण्यात यावे. किंवा जाळून नष्ट करण्यात आली पाहिजे. जेणकरून तलावात पुन्हा जलपर्णी ची समस्या निर्माण होणार नाही.

तसेच या तलावातील पाणी स्वच्छ राहण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने याठिकाणी मैला शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात यावा. अशी मागणी मी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कडे केली आहे. याबाबतीत. मोहोळ यांनी या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. असेही सुतार म्हणाले.

IMG 20210522 WA0207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये