पुणे शहर

मेधा कुलकर्णी यांना भाजपाने राष्ट्रीय पातळीवर सोपवली मोठी जबाबदारी

पुणे : कोथरूडच्या माजी आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांना भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या पदामुळे कुलकर्णी यांना राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक दृष्ट्या मोठी जबाबदारी मिळाली आहे.(BJP has given a big responsibility to Medha Kulkarni at the national level)

भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता ते नगरसेवक, कोथरूड च्या आमदार , भाजप महिला मोर्चा पुणे शहराध्यक्ष अशा विविध जबाबदारी मेधा कुलकर्णी यांनी यशस्वी पार पाडल्या आहेत. २०१९ सालीच्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या विद्यमान आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मधून उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर वारंवार कुलकर्णीं नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मेधा कुलकर्णी यांना पक्षाने मोठी जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पक्षाने मोठी जबाबदारी दिली. याबद्दल मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानते. मला पक्षाने दिलेली जबाबदारी मी समर्थ पणे पार पाडून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

Img 20210522 wa0203

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये