पुणे शहर

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपाययोजना आखण्यासाठी महापालिकेने सर्व पक्ष नेत्यांची त्वरित बैठक घ्यावी : दिपाली धुमाळ

पुणे :  पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या  काही दिवसांपासून पुणे शहरात रोज पाच हजाराच्या वर रुग्णांची संख्या आहे.  वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या मानाने महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती योजना झाल्याचे दिसत नाही. सत्ताधारी व प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याने नागरिकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे परिपूर्ण उपाययोजना आखण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नेत्यांबरोबर तातडीने बैठक घेण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. Municipal Corporation should hold an immediate meeting of all party leaders to take measures as the prevalence of corona is increasing in the city: Deepali Dhumal

या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे.  प्रशासन व सत्ताधारी या संबधी अनेक उपाययोजना व निर्णय व धोरण ठरवत आहे. परंतु याला फारसा यश मिळत नाही. उलट अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे. 

क्वारंटाईन बाबतीत,  बेड्सच्या उपलब्धतेबाबत अनेक समस्या आहेत.  अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहत आहेत. त्यामुळे घरातील लोकांची व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या आधी सुद्धा आम्ही व्हेंटिलेटर ,ऑक्‍सिजन बेड वाढवणे व काही उपाय योजना आखणे संबंधित पत्र दिले होते. तसेच रुग्ण संख्या वाढू लागली तेव्हापासूनच आम्ही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत किमान एक सी.सी.सी सेंटर सुरू करावा अशी मागणी केली असताना देखील त्याची अद्याप पर्यंत पूर्तता करण्यात आली नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. सत्ताधारी व प्रशासन ताळमेळ नसल्यानेच गोंधळ उडत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Img 20210223 wa0156

खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही, त्यामुळे नाहक रुग्णांचा बळी जात आहे. मुंबई महानगरपालिके ज्या प्रमाणे उपायोजना आखल्या आहेत  त्याच धर्तीवर पुणे महानगरपालिकेने सुद्धा उपाययोजना आखाव्यात व पुण्यात परिपूर्ण उपाययोजना आखण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नेत्यांबरोबर तातडीने बैठक आयोजित करावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये