यूपीतील निवडणूका वेळेवर होणार : निवडणूक आयोगाचे संकेत

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचा दौरा केल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. आयोगाने म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील राजकीय पक्षांना इच्छा आहे की, पुढील वर्षी विधानसभा निवडणुका कोविड नियमांचे पालन करत वेळेवर घ्याव्यात. निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, आम्ही प्रशासन, पोलिस आणि राजकीय पक्षांशी चर्चा केली आहे, आम्ही त्यांना कोविड नियमावली बद्दल माहिती दिली आहे. अनेक राजकीय पक्षांनी रॅलींबाबत चिंता व्यक्त केली. त्यांची संख्या मर्यादित असावी असे अनेकांनी सांगितले.
चंद्रा म्हणाले की, आम्हाला वाटते की, जास्तीत जास्त लोकांनी निवडणूक प्रक्रियेचा भाग बनावे. वृद्ध आणि दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सुविधा देऊ. अंतिम मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, ‘यूपीमधील विद्यमान सरकारचा कार्यकाळ 14 मे रोजी संपत आहे. निवडणूक आयोग फक्त सामान्य मतदान घेईल. आम्ही राजकीय पक्षांसोबत बैठका घेतल्या आहेत, आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत, आम्ही आयकर विभाग, जीएसटी, एनसीबी, नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्रलोभनमुक्त निवडणूक व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. या संदर्भात आम्ही मुख्य सचिव, डीजी इत्यादींसोबत बैठकही घेतली आहे.’
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कोविड नियमावली अंतर्गत निवडणुका घ्याव्यात असे सांगितले आहे. निवडणूक आयोग दाट लोकवस्तीचे मतदान केंद्र मोकळ्या जागी आणेल, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जाईल आणि वृद्धांसाठीच्या सुविधांकडेही लक्ष दिले जाईल. पेड न्यूजवरही चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच मतदार यादी 5 जानेवारीला प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही देण्यात आली.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
सिंहासन News ‘थर्टी फर्स्ट’ला शिर्डीतील साईबाबा मंदिर बंद राहणार.. https://www.sinhasannews.com/sai-baba-temple-in-shirdi-will-be-closed-on-thirty-first-7864/



