शैक्षणिक

राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन

पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी हॅकाथॉन स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसिटीई)मान्यतेने इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ‘इनोव्हेट यु टेकाथॉन २०२४’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे फेब्रुवारी महिन्यात एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या आवारात आयोजन करण्यात आले. चार लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत.

Img 20240107 wa00008345898566170837426
स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी सितारामन यांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यालयात करण्यात आले.

पुण्यासह प्रामुख्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी सितारामन यांच्या हस्ते दिल्ली येथील मुख्य कार्यालयात करण्यात आले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवतील असे मूलभूत विषयांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचे आव्हान या स्पर्धेतील स्पर्धेकांसमोर असणार आहे.

आधुनिक शेती, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यांमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने काय कल्पक उपाय निघू शकतात याचा शोध या स्पर्धेत घेतला जाईल. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षण पारितोषिके प्रदान केली जाणार आहे, तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांच्या मुक्कामाची सोय केली जाणार आहे, असे कल्पेश यादव यांनी सांगितले.

Img 20231112 wa00053541767882370111537

देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली राहणार आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह देशभरातून स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्यातील कल्पनाशक्तीला वाव द्यावा, असे आवाहन एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (आयओआयटी) प्राचार्य डॉ. प्रदीप माने यांनी केले.

एआयसीटीई, एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचे प्रमुख साहाय्य या स्पर्धेसाठी असणार आहे. ब्रेनोव्हिजन ही संस्था तांत्रिक साहाय्य करणार आहे. एनईएटी (दिल्ली) यांचे मार्गदर्शन असणार आहे.

नोंदणीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या https://innovateyou.in या वेबसाईटवर स्पर्धक नावनोंदणी करू शकणार आहेत.

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांची रोख पारितोषिके या स्पर्धेतील विजेत्यांना दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकास दोन लाख रुपये दिले जाणार आहेत. द्वितीय क्रमांकास एक लाख, तृतीय ७५,००० तर उत्तेजनार्थ २५ हजार रुपयांची दोन बक्षिसे असणार आहेत.

उद्योजक घडवण्याचे प्रयत्न
महाराष्ट्रात हॅकाथॉन सारख्या स्पर्धेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. यातून अनेक उद्योजक घडू शकतात. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहे. ग्रामीण भागातील कल्पक प्रकल्पांना व्यवसायात उतरण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा इनोव्हेशन फाउंडेशनचा मानस असल्याचे संस्थेचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये