अखिल भारतीय युवक मराठा महासंघ” “महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष” पदी अमोल हुलावळे यांची निवड

पुणे : “अखिल भारतीय युवक मराठा महासंघ” “महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष” पदी अमोल हुलावळे यांची निवड करण्यात आली. समाजासाठी असलेले योगदान, सर्वसमावेशक कार्यपद्धती यामुळे हुलावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमोल हुलावळे म्हणाले, कोणतेही पद आले की नक्कीच जबाबदारी वाढते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवविचार घेऊन १९०० साली स्थापन झालेली ही सर्वात जुनी १२१ वर्षांची मराठ्यांची सर्वात पहिली अराजकीय संघटना आहे. १८ पगड जाती १२ बलुतेदार,सर्व अलुतेदार, बहुजन समाज यांना एकसंघ घेऊन “शिवविचार” जोपासणाऱ्या ह्या संघटनेची मला जबाबदारी सर्व वरिष्ठांनी दिली याचा मला अभिमान आहेच पण जबाबदारी ची जाणीव ही आहे. नक्कीच सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन नक्कीच समाजासाठी मी चांगले काम उभे करेल हा मला विश्वास आहे.
या वेळी कार्यक्रम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष नानासाहेब नानावटे , शेतकरी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, युवक प्रदेशाध्यक्ष रणजित जगताप, प्रदेश संघटक श्री. करण भाऊ रणवीर, सागरभाऊ शिंदे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाटील, नंदकुमार बालवडकर आदी. मान्यवर तसेच मोठ्या संख्येने मित्रमंडळी उपस्थित होती.







