पोलीस, महापालिका, अग्नीशमन दलाच्या बांधवांना राखी बांधून राष्ट्रवादी कोथरूड मतदारसंघाकडून राखीपौर्णीमा साजरी
कोथरुड : बंध प्रेमाचा…. बंध विश्वासाचा… राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर आणि महिला विभाग अध्यक्षा तेजल दुधाने यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन निमित्ताने कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये रक्षाबंधन साजरी करण्यात आली .
१९ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा, याच राखीपौर्णिमेचे औचित्य साधून, सामाजिक बांधिलकी जपत कोथरूड विधानसभा मतदार संघातील पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, सफाई कर्मचारी, अग्निशामक दलातील कर्मचारी या सर्वांना राखी बांधून कोथरूड विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व ठिकाणी खूप आनंदाचे वातावरण होते, सर्व महिला राखी बांधत असतानाच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच आम्हांला आमची ओवाळणी देऊन गेला.यावर्षीची एक आगळी वेगळी रक्षाबंधन साजरी केल्याचे एक समाधान वाटत आहे.
या प्रसंगी कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष मीना मोरे, विधानसभा उपाध्यक्ष बहाद्दूर भाभी, विधानसभा सरचिटणीस दिपाली गायकवाड, विधानसभा सरचिटणीस प्रीती डोंगरे, विधानसभा सचिव राधिका वाईकर, प्र. क्र. ११ अध्यक्ष कांता खिलारे, कार्याध्यक्ष सुनीता खरात, कार्याध्यक्ष रेखा नाणेकर, पूनम तुसाम, प्र. क्र. ३१ अध्यक्ष मालन मोहोळ, वैशाली दिघे, मालती चरवड, जयश्री वारे, मंदाकिनी वनसाळे, काजल खुडे, द्रौपदी कोकिळा उपस्थित होते.