नवाजुद्दीनने केला लोकलने प्रवास; चाहते झाले खूश म्हणाले…

मुंबई : बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी नवाजुद्दीन सिद्दिकी हा एक आहे. त्याने त्याच्या अभिनयाने अनेक चाहते मिळवले आहेत. फक्त त्याच्या अभिनयाचेच नव्हे तर त्याच्या साधेपणाचे ही सर्वत्र ठिकाणी कौतुक केले जाते. बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही भरपूर, असे असले तरीही नवाजुद्दीनने नुकताच लोकलमधून प्रवास करून साधेपणाचा आदर्श ठेवत आपल्या चाहत्यांना खूश केले आहे.
नवाज प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत होता. ट्रेन आल्यानंतर तो त्यामध्ये जाऊन बसला. याचे चित्रण त्याच्या चाहत्यांनी केले असून तो व्हिडिओ त्याने कौतुकाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. नवाजुद्दीन सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचा व तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांचा हिरोपंती 2 हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मीरा रोडवर चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर त्याला एका कार्यक्रमाला जायचे होते. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकू नये म्हणून त्याने या मार्गाचा अवलंब केला असल्याचे त्याने सांगितले. गॉगल, कॅप आणि पांढऱ्या रंगाचा मास्क याचा वापर करून चेहरा झाकण्याचा त्याने प्रयत्न केला होता. ‘मुंबई लोकल ट्रेन मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी माझ्यासमोर बसला आहे.’ असा कॅप्शन देत युजरने व्हिडिओ शेअर केला, यावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.




