पुणे हिट अँड रन मध्ये जीव गमावलेले पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचेकडून एक लाख रुपयांची मदत
जखमी पोलीस कर्मचाऱ्याच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत
पुणे : पुण्यात काल झालेल्या हिट अँड रन प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांच्या कुटंबीयांना 1 लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच जखमी पोलीस कर्मचारी पी सी शिंदे यांच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी जाहीर केले आहे.
दीपक मानकर म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित असताना घडलेल्या या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करित असून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या या पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांच्या कुटुबीयांना मी एक लाख रुपयांची मदत करणार आहे. आणि जखमी कर्मचारी पी.सी.शिंदे यांच्या उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे.तसेच राज्य सरकारने देखील त्यांना मदत करावी अशी मागणीही मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे करणार आहे.
पुण्यात काल मध्यरात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका पोलिस अधिकारी समाधान कोळी यांचा मृ्त्यू झाला आहे. तर एक पोलीस अधिकारी पी सी शिंदे जखमी झाले आहेत.हे पोलीस अधिकारी गस्त घालत असताना हा अपघात घडला. दरम्यान या घटनेतील आरोपी सिद्धार्थ केंगार याला पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याची स्विफ्ट कार ताब्यात घेण्यात आली आहे या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यात काल मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या हॅरिस ब्रीजखाली दोन पोलीस रात्रीची गस्त घालण्यासाठी गेले होते. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस अधिकारी दुचाकीवरुन हॅरिस ब्रीजखाली जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका वेगवान चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली.
एका पोलिसाचा मृत्यू, एक जखमी
ही धडक इतकी जबरदस्त होती की यात समाधान कोळी या पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला आहे. तर शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.