पुणे शहर

पुण्यातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची मागणी

पुणे : पुणे शहरातील शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग(प्राथमिक आणि माध्यमिक) प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दीपक मानकर म्हणाले, दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. पोलिसांच्या तपासात सदर शाळेच्या व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसणे, शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसणे. यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Screenshot 2024 08 20 16 33 27 551301213897430355510

भविष्यात अशी दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने पुणे शहरातील शाळांची तपासणी करून शाळा व्यवस्थापनास सूचना देण्यात याव्यात की, मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छतागृहात पुरुष कर्मचारी नेमण्यात यावेत, शाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करणे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शहरातील शाळांमध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात यावी. अशी मागणी मानकर यांनी केली आहे.

Fb img 16474137115315333568191096823716
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये