पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या 324 व्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली..

पुणे : pune थोरले बाजीराव पेशवे Thorle Bajirao Peshwa यांच्या 324 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
बालगंधर्व येथील झाशीच्या राणीच्या पुतळ्याला अभिवादन करुन सकाळी 9 वाजता या दीचाज रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर जयघोषात निघालेल्या रॅली ने केसरी वाडा येथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले व शनिवारवाडा shaniwar wada येथे थोरले बाजीराव पेशवे पुतळ्याला नमन करुन या रॅलीचा समारोप करण्यात आला.
पुणे शहर तसेच वाघोली, हडपसर, शिक्रापूर, बालेवाडी, नसरापूर या भागातून अनेक पेशवे प्रेमी मोठ्या संख्येने आवर्जून या रॅलीत सहभागी झाले होते. 150 पेक्षा जास्त दुचाकी गाड्यांसह निघालेल्या शिस्तबद्ध रॅलीत, समाजपयोगी घोषणा देण्यात आल्या. पारंपरिक पेहराव करून नागरिक या रॅलीत उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. थोरले बाजीराव यांच्यासारखा पेहराव परिधान केलेल्या नील धडफळेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या रॅलीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या, पुणे जिल्ह्याच्या वतीने शनिवारवाडा प्रांगणात भव्य अशी पेशवे सृष्टी निर्माण करावी व पुणे एअरपोर्ट ला थोरले बाजीराव पेशवे एअरपोर्ट असे नामकरण करण्यात यावे अशा दोन मागण्या सरकार पुढे मांडण्यात आल्या. याबाबतचा राज्यसरकारशी पत्रव्यवहार सुरू आहे अशी माहिती पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी दिली.
आजच्या या कार्यक्रमाला शनिवाड्यावर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे, टिळक प्रतिष्ठानचे शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक, पेशवे प्रतिष्ठानचे कुंदनकुमार साठे उपस्थित होते. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांनी फोन वरून रॅलीला शुभेच्छा दिल्या.



अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने केतकी कुलकर्णी, दिलीप सातभाई, विजय शेकदार, धनश्री धडफळे, प्रसाद गिजरे, किशोर सरपोतदार, सुनील शिरगांवकर, वंदना धर्माधिकारी, नितीन फडणीस, राहुल जोशी, अमोघ पाठक, पल्लवी गाडगीळ, राहुल करमरकर, विकास कुलकर्णी, अवधूत देशमुख, मुग्धा अनगळ, विवेक खिरवडकर, रेणुका व गौरव गोखले, दत्तात्रय देशपांडे, मयुरेश चंद्रचूड, रोहिणी व श्रीकांत ढोले, श्री व सौ श्रीकांत क्षीरसागर, किरण काळे, राजेंद्र कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, नीरज कुलकर्णी, जयश्री घाटे, लता बुरसे, रंगोली देशमुख, गायत्री मढीकर, अश्विनी व सुनील औरसंग, योगेश व प्रीती अनगळ, अभिनव पाठक, माधव कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, सुभाष वानकर, अभय जोगळेकर, ऋषिकेश गोरे, गिरीश ओक व टीम, प्रसाद जोशी, जयदीप पटवर्धन, मिलिंद जोशी, निलेश क्षीरसागर, उमाकांत कुलकर्णी आदी व महासंघाचे पदाधिकारी रॅली मध्ये सहभागी होते. या रॅली चे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते.





