सुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर आल्या असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची त्यांनी भेट झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुजात आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. तसेच आंबेडकर कुटुंबियांसोबत त्यांनी फोटो देखील काढले.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुंबईतील चैत्यभूमीवर देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्यासंख्येने भीम अनुयायी येत आहेत. आज राज्यातील अनेक नेत्यांनी देखील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन केले. खासदार सुप्रिया सुळे या देखील चैत्यभूमीवर आल्या होत्या. त्यावेळी सुजात आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबातील सदस्यांशी त्यांची भेट झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुजात आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. सुजात आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबियांशी भेटल्यानंतर त्यांनी त्यांची विचारपूस केली. हा राजकारणाबाहेरचा संवाद असल्याचे म्हटलं जात आहे.




