राजकीय

अंधभक्तांवर कायदेशीर कारवाई करावी… अन्यथा

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत या शिवसेना नेतृत्वाबाबत व शिवसैनिकांबाबत सोशल मीडियाच्या फक्त नमो नमो या व्हॉट्सॲपग्रुप वर आक्षेपार्ह मजकूर व टिप्पणी केल्याच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने त्या व्हॉट्सॲप ग्रूप सदस्याविरोधात सायबर गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना कोथरूड विभागप्रमुख उमेश भेलके, माजी वृक्ष संवर्धन समिती सदस्य जयदीप पडवळ, कोथरुड समन्वयक अजय भुवड, शिवाजीनगर समन्वयक विश्वास चव्हाण यांनी सायबर गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

याबाबत बोलताना भेलके म्हणाले, शिवसेना नेतृत्वाबाबत फक्त नमो नमो या ग्रुप मधील सदस्याने यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

जयदीप पडवळ म्हणाले, कोणी हि उठतो आणि राजकीय नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो. मी अंधभक्तांना विनंती करतो आहे की, शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका. तसेच या प्रकरणी पोलिसांनी तातडीने सायबर गुन्ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अन्यथा शिवसेनेच्या पध्दतीने उत्तर देण्यास शिवसैनिक सक्षम आहेत.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये