पुणे शहर

हाथरस घटनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा निषेध मोर्चा

केंद्र सरकार व उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहराच्या वतीने देशभरातील महिला आणि दलित यांचेवरील वाढत्या अन्याय, अत्याचार आणि खुनांच्या घटनां विरोधात तसेच उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित भगिनीवरील बलात्कार व खुन घटनेच्या निषेधार्थ डेक्कन ते खंडोबा मंदिर चौक पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहराध्यक्ष विजय डाकले यांच्या नेतृत्वाखाली या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी यूपीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळवून द्यावा,  या घटनेतील दोशींना फाशीची शिक्षा द्यावी आणि उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करावे अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी प्रदिप दैशमुख ,रविंद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, बाबा धुमाळ, स्वाती पोकळे, महेश हांडे, संतोष नांगरे, अझिम गुडाकुवाला, भोलासिंग अरोरा, संतोष बेंद्र्, लहु कांबळे, विजय बगाडे, श्रीनिवास दासारी, वैजनाथ वाघमारे, सचिन डाकले, महैश शिंदे , भगवान वैराट यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

तुपे म्हणाले अत्यंत लाजीरवाणी घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. अशा घटना तिथे वारंवार घडत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशातील एका पक्षाचे प्रमुख नेते संसदेचे सदस्य पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी जात असताना त्यांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते हे आज देशाने पाहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला दोषींना पाठिशी घालायचे आहे असेच दिसत आहे. योगी सरकारनं आता राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे.

डाकले म्हणाले, मोदी सरकारच्या राजवटीत सर्वत्र अराजकता माजलेली आहे. अत्याचाराचे प्रमाण वाढत असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबल्या पाहिजेत.  उत्तर प्रदेश मधील घटनेतील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी. 

Fb img 1601614578923

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये