पुणे शहर

सुनेत्रा पवार यांनी साधला कोथरूड मधील कमिन्स कंपनीतील कामगारांशी संवाद..

कोथरूड : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचारा दरम्यान कोथरूड डहाणूकर कॉलनी येथील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांशी संवाद साधला.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी कामगारांशी संवाद साधताना यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व येणाऱ्या काळात त्यावर मार्ग काढू असा विश्वास व्यक्त केला. कमिन्स कंपनीतील बराचसा कामगार बारामती लोकसभा मतदार संघात येत असलेल्या वारजे, भुसारी कॉलनी, बावधन, शिवणे या भागातही राहतो. त्यामुळे हा संवाद दौरा झाला.

यावेळी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान  पदावर बसवण्यासाठी घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन कामगारांना केले.

Img 20240404 wa00195661228638643442239
Img 20240404 wa00154462680026350583661
Img 20240404 wa00142311409567432001146

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये