पुणे शहर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणेच्या तीन शाखा कार्यान्वित

पुणे : भारतमाता अभ्यासिका, पर्वती पायथा येथे झालेल्या संगठनात्मक कार्यक्रमात, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणेच्या तीन शाखा पूर्णतः कार्यान्वित करण्यात आल्या. या बैठकीत सहकारनगर व बिबवेवाडी शाखांच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. कोंढव्यात नवीन शाखा सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

एकाच वेळी तीन शाखांची निर्मिती होणे हा एक वेगळा विक्रमच आहे अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. मागील दीड वर्षात महासंघाने 16 शाखा सुरू केल्या आहेत आणि ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

आजच्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत धडफळे, पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ केतकी कुलकर्णी, कार्याध्यक्ष सचिन टापरे, ब्रह्मद्योग अध्यक्ष तेजस फाटक, ब्रह्मकेसरी प्रमुख राहुल साकतकर, शाखा अध्यक्ष डॉ अर्चना जोशी, शशांक शिरगांवकर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संघटन प्रमुख सुनील शिरगांवकर यांनी केले

Img 20221126 wa0212847205965836399706

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये