सिनेजगत

निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर व्यक्तिमत्त्व दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांनी मंगळवारी (दि.30) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री गार्गी फुले म्हणाल्या, मला अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला पक्षप्रवेशाबाबत विचारणा झाल्यानंतर ऱाष्ट्रवादी पक्षाचा जो विचार आहे, त्याच विचारांचे माझे बाबा निळू फुले देखील होते. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत माझ्या वडिलांचे चांगले संबंध होते. राष्ट्रवादीत प्रवेश करुन आता मुख्य प्रवाहात काम करायचे आहे, असे गार्गी फुले यांनी सांगितले.

गार्गी फुले या नाटक आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 1998 पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. प्रायोगिक नाट्य चळवळीत त्या चांगल्याच सक्रीय आहेत. भारतीय नाट्यक्षेत्रात मोठे नाव असलेले सत्यदेव दुबे यांच्याकडे त्यांनी काही काळ काम केले आहे. त्या सत्यदेव दुबे यांच्या विद्यार्थीनीच. त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी एमएची पदवी (Women Liberation) या विषयात घेतली आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

गार्गी फुले यांनी आतापर्यंत मळभ (किरण यज्ज्ञपावीत), कोवळी उन्हे (विजय तेंडुलकर), श्रीमंत (विजय तेंडुलकर), सोनाटा (महेश एलकुंचवर), वासंसी जीर्णनी (महेश एलकुंचवर), सुदामा के चावल (वसंत देव), या नाटकात काम केले आहे. (Maharashtra Politics) तर, राजा राणी ची गं जोडी (colors मराठी), सुंदरा मनामध्ये भरली (colors मराठी), तुला पाहते रे (zee टीव्ही), कट्टी बट्टी (zee युवा), या टीव्ही मालिकांमध्ये गार्गी फुलेने काम केले आहे. भाडीपा चिकटगुंडे, राते या वेबसीरीजमध्येही त्यांनी काम केलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मनोरंजन केले. निळू फुले यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत सुमारे २५० मराठी आणि हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या. मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कामगिरी बजावणार्‍या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक म्हणून त्यांचा ओळख आहे. ते सामाजिक कार्यकर्तेही होते. राष्ट्र सेवा दलाचे त्यांनी काम केले होते. आता त्यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले हिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये