पुणे शहर

पगार होत नसल्याने महापालिकेच्या शिक्षण मंडळाबाहेर कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या मराठी, इंग्रजी व उर्दू या तिन्ही माध्यमातील एकूण २८५ शाळांमधून लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया घडवण्याचे कार्य करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका तसेच कायम व रोजंदारी मध्ये काम करणारे शिपाई, रखवालदार यांच्या दर महिन्याचे वेतन मिळवण्यासाठी गेली दोनवर्षे झाली सातत्याने झगडावे लागत आहे त्यामुळे याविरोधात आज या कर्मचाऱ्यांच्या वतीने शिक्षण मंडळाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

कामगार कायद्या प्रमाणे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार कर्मचार्‍यांचे वेतन दर महिन्याच्या ५ ते ७ तारखेपर्यंत अदा करणे हे बंधनकारक आहे. सदर विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी दरमहाच्या २० तारखेला संबंधीत वेतन अदा करणार्‍या लेखनिकाकडे दिली जाते. पण वेतन अदा करणारे लेखनिक काही ना काही कारणे सांगून वेतन बील करण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. वेळेत वेतन अदा करणे विषयीच्या लेखी तक्रारी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) कडे कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या त्या अनुशंगाने युनियनच्या वतीने कामगांराचे वेतन वेळेत करणे विषयी एकूण २३ लेखी पत्रव्यवहार प्रशासनाबरोबर केला गेला आहे. तसेच युनियन पदाधिकाऱ्यांनी वारंवार प्रशासना बरोबर चर्चात्मक बैठका देखील घेतल्या तरी देखील वेळेत वेतन दिले गेले नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यालयावर आज कर्मचाऱ्यांनी जोरदार निषेध आंदोलन केले.

सदर अंदोलनामध्ये युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, “शिक्षण विभागात काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका,सेविका व शिपाई, रखवालदार यांचे वेतन वेळेत अदा नाही केले किंवा प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक करण्यास दिरंगाई व टाळाटाळ केल्यास संबंधीत कामचुकार व कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून अधिकारी व बील लेखनिकावर “मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम – १९४९, कलम ५६ (२) ब नुसार वेतनवाढ किंवा पदोन्नती रोखून ठेवणे यात दक्षता रोध ओलांडू न देणे” या शिक्षेची मागणी युनियनच्या वतीने करण्यात येईल याची दखल प्रशासनाने घ्यावी असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी युनियनच्या संयुक्त चिटणीस कॉ. रोहिणी जाधव, कार्यालयीन चिटणीस कॉ. वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष कॉ. राम अडागळे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कॉ. करुणा गजधनी शिक्षण विभागाचे विभागीय अध्यक्ष कॉ. अजित मेंगे, सचिव कॉ. ओंकार काळे कॉ. कलावती खाटपे, कॉ. प्रिया ठाकर, केतकीे मटाले, वनीता कानडे, जेष्ठ सल्लागार कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. प्रकाश हुरकडली तसेच शिक्षण विभागाचे बालवाडी शिक्षिका, सेविका व रखवालदार, शिपाई या अंदोलनात सहभागी झाले.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात बालवाडी शिक्षिका, सेविका, रखवालदार व शिपाई असे एकूण १८७७ कर्मचारी काम करत आहेत. शिक्षण मंडळ हे महानगरपालिके मध्ये विलीन झाल्यापासून दर महाचे वेतन २० ते २५ तारखेच्या पुढेच अदा केले जाते. काही कर्मचार्‍यांनी अनेक बँकाचे व फायनान्सचे घर व दुचाकी तसेच मुलांच्या शिक्षण व विवाहासाठी कर्ज घेतलेले आहे. त्या कर्जाचे हप्ते २, ३, ५, ७ अशा तारखांना बँकेतून कट होतात पण वेतनच जमा झाले नाही तर हप्ते वेळेवर वेतनातून कट झाले नाही तर दर महा हप्त्याची रक्कम सोडून ७५०/- ते १०००/- ₹ नाहक भुर्दंड भरावा लागतो आहे. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.


तसेच शिक्षण विभागात काम करणाऱ्या बालवाडी शिक्षिका व सेविका १९८० सालापासून तुटपुंज्या मानधनावर काम करतात. युनियनच्या वतीने सदर बालवाडी शिक्षिका व सेविकेच्या दर दोन वर्षीच्या वेतनात १०% वाढ होणे विषयीचा ठराव मांडला त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी १०% वेतन वाढीचा ठराव करून स्थायी समिती व जनरल बॉडीने मान्यता देऊन देखील शिक्षण विभाग त्याची अमंलबजावणी करत नाही. तसेच वैद्यकिय, अर्जित व बाळांतपणाची रजा देखील देत नाही शिवाय महानगरपालिकेची वैद्यकिय सहाय्य योजनेचा लाभ देण्याचे धोरण असताना देखील त्यापासून देखील आम्हाला वंचित ठेवले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी यावेळी केला.

काही बालवाडी शिक्षिका व सेविका वयोपरत्वे सेवानिवृत्त झाल्या काही मृत्युमुखी पडल्या तरी त्यांच्या ग्रॅच्युटी व बोनस किंवा काही थकीत देय्य रक्कमा देखील वेळेवर अदा केले जात नाही. तसेच शिक्षण विभागातील शाळेत लहान मुलांचे शालेय प्रोजेक्ट तयार करण्याचे साहित्त्याचा खर्च देखील बालवाडी शिक्षिकांना करावा लागतो तो खर्च सुद्धा प्रशासन देत नाही. मनपाच्या शाळेतील वरच्या वर्गाचे शिक्षक रजेवर असले की संबंधीत मुख्याध्यापक आम्हाला वर्ग घेण्यास भाग पाडतात तसेच सेविकेना वर्ग सफाईचे कामे देखील करून घेतली जातात अशा प्रकारे बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा असे आवाहन युनियनच्या वतीने यावेळी करण्यात आले.

Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये