पुणे शहर

आता कर्वेनगर ही असुरक्षित ; अज्ञातांकडून चारचाकी गाड्या व फ्लॅटच्या काचा फोडून नुकसान..

कर्वेनगर : कर्वेनगर मधील गोल्डन पेटल , मातोश्री कॉलनी परिसरात भालेकर उद्याना बाहेर रस्त्याला लावण्यात आलेल्या गाड्यांच्या काचा अज्ञात टोळक्यांकडून फोडण्यात आल्या असून एका सोसायटीच्या फ्लॅटच्या खिडक्यांवर ही दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून भीतीचे वतावरण निर्माण झाले आहे. Now Karvenagar is insecure;  The glass of cars and flats was broken

1622784249293

या बाबत राजेंद्र भालेकर व रमेश कोडमनकर   यांच्याकडून कर्वेनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

गुरवारी दिनांक ३ जून रात्री ११.३० च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. भालेकर उद्यानासमोर लावण्यात आलेल्या दोन इंडिका व एक ओमिनी या चार चाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून येथील श्रीराम पार्क अपार्टमेंट च्या एका फ्लॅटच्या खिडक्यांवर दगड फेकून काच फोडण्यात आली आहे. रात्री दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून हा प्रकार केला गेला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे असे कृत्य करणाऱ्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती राहिली नाही का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Img 20210522 wa0203

वारजे माळवाडी व कोथरुड परिसरातील वस्ती विभागात असे प्रकार मागे अनेकवेळा घडले आहेत. दहशत माजवण्याच्या उद्देशाने असे प्रकार घडले. मात्र त्याचेच लोन आता कर्वेनगर मध्ये आले आहे का असा सवाल केला जाऊ लागला आहे.

सध्या लॉक डाऊनमुळे रस्त्यावर लवकर सामसूम होते. त्यामुळे कर्वेनगर परिसरात दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांचे प्रमाण ही वाढले आहे. कर्वेनगर मधील नदी काठच्या डीपी रस्त्यावर, सोसायट्यांच्या बाहेरील बंद दुकानांच्या समोर घोळकेच्या घोळके बसलेले असतात. त्यामुळे या परिसरात पोलिसांकडून गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये