पुणे शहर

लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असलेल्या तरुणाला पुण्यात अटक

पुणे : दहशतवादी विरोधी पथकाने लष्कर ए तोयबासाठी काम करावे म्हणून पैसे मिळालेला मोहम्मद जुनेदला दापोडीतून अटक केली आहे. जम्मू काश्मीरमधून हे पैसे मिळाल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले.

जुनेद सोशल मीडियावरून जम्मू-काश्मीरच्या लष्कर ए तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात आला होता. आज दुपारी जुनेदला पुण्यातील कोर्टोत हजर केले जाणार आहे. पुण्यातील हे दहशतवादी कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

काल दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर जुनेद चौकशीत दोषी आढळल्याने रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी आहे. हा मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये