पुणे शहर

उद्या कोथरूडमध्ये श्रीधर फडके यांच्या ‘गीतरामायण’कार्यक्रमाचे आयोजन..

माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजन

कोथरूड : अयोध्येत दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भव्य  ‘श्रीराम मंदीर उदघाटन व श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्याचे औचित्य साधून कोथरूड मध्ये  ग. दि. माडगुळकर विरचित, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेला श्रीधर फडके यांचा ‘गीतरामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

उद्या बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी कोथरूड मधील उजव्या भुसारी कॉलनीत असणाऱ्या स्वा. वि. दा. सावरकर मैदानावर सायंकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे संयोजक माजी नगरसेवक  व भाजप भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील  यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार /राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांना ऊर्जा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असून त्यांचे विचार ही ऐकता येणार आहेत. 

Img 20230717 wa0012281298961742807603730839

किरण दगडे पाटील म्हणाले, भारतीयांच्या मनातील अयोध्येतील श्रीरामाचे मंदिराचे स्वप्न 22 जानेवारी रोजी पूर्ण होत आहे. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण असणार आहे. हा क्षण अनुभवण्याची तयारी सर्वजण करत आहेत. आम्ही मराठी रसिकांच्या आणि राम भक्तांच्या मनात घर केलेला ग.दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेला श्रीधर फडके यांचा ‘गीतरामायण ‘ कार्यक्रमाचे आयोजन १० जानेवारी रोजी केले आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहून गीतांच्या माध्यमातून श्री राम चिरित्रचा अनुभव घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Img 20240109 wa00195036803719794673034
Img 20231112 wa00053541767882370111537
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये