महाराष्ट्र

महेश झगडे यांची कस्तुरबा रुग्णालयाला 11 लाखाची मदत

पुणे : निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.भारतीय प्रशासकीय सेवेतील ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर झगडे निवृत्त झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची नियुक्ती त्यांनी स्वीकारली. त्यासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा मनोदय त्यांनी राज्य शासनाकडे मांडला होता.

Img 20221022 104558 1014877655567210833323

मिळणाऱ्या मानधनातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा विचार त्यांनी केला. त्यानुसार मानधनाची रक्कम कस्तुरबा रुग्णालयासाठी दिली. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय १९४५ मध्ये महात्मा गांधी यांच्या शिष्या डॉ. सुशीला नय्यर यांनी सुरू केले. हे रुग्णालय एक हजार खाटांचे असून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दरवर्षी हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. महेश झगडे म्हणाले, ३४ वर्षांच्या सेवेतून निवृत्त होताना त्यानंतर कोणतीही सरकारी जबाबदारी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.

Fb img 1666600270584

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून नागरिकांच्या मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची तीन महिन्यांची नियुक्ती स्वीकारली. या नियुक्तीसाठी मानधन न घेण्याचा विचार होता, मात्र तो बदलून मिळणारे मानधन ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कस्तुरबा रुग्णालयासाठी धनादेश दिला आहे. भविष्यात ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वांनीच शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहनही झगडे यांनी केले.

Fb img 1666591580606
Png 20221024 133102 0000 1
Fb img 1666593625519
Img 20221024 wa00494898120075662566733
Fb img 1666533939031
Screenshot 2020 1113 1558146592854911118712363
Img 20221019 143448 4921652329476299347948
Fb img 1666593843187
Screenshot 2022 10 24 09 16 55 04
Fb img 1666593631848
Fb img 1666593719680
Img 20221024 wa0181
Img 20221024 wa00421661058955266389431
Img 20221024 wa0044871667030408772591
Img 20221024 wa00127723618126263976558
Img 20221024 wa00101304911003436854220
Img 20211031 wa00066985050640051471264
Wp image3090221943230277582
Img 20211101 wa00118330850860855581379
Img 20221023 wa0081
Img 20221021 wa0325
Fb img 1666660333376
Img 20221021 wa0478
Img 20221021 wa0473
Img 20221021 wa0474
Img 20221021 wa0475
Img 20221022 wa0300
Img 20221023 wa0082
Screenshot 2022 10 23 18 39 25 76
Img 20221024 wa0602
Img 20221024 wa0580
Img 20221021 wa0416
Screenshot 2022 10 19 10 52 53 83
Img 20221020 wa00071429831687423321840

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये