पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने कॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी

पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सारसबाग या ठिकाणी कामगार सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेत कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे व माजी कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे यांनी मार्गदर्शन केले. “अण्णा भाऊ साठे हे एक महान दलित साहित्यिक होते. त्यांचे लेखन साहित्त्यामध्ये अन्याया विरुद्ध पेटून उठणारे, बंडखोर वृत्तीच्या व्यक्ती रेखा दिसून येतात. अण्णा भाऊ साठे यांनी वयाच्या ४९ वर्षाच्या कालावधी मध्ये या देशाला ३२ कादंबऱ्या,३ नाटके,१० पोवाडे, १५ कथासंग्रह,१२ पटकथा एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्याचं लेणं दिलं तरी या महान साहित्यीक उपेक्षितच राहिले आहेत अशा भावना नरसिंगे व गमरे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी युनियनच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला करण्यात आली. या प्रसंगी कार्यालयीन चिटणीस कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी सभेला मार्गदर्शन करताना असे म्हटले की,” कॉ. अण्णा भाऊ साठे हे एक लोक कवी, लेखक आणि थोर समाज सुधारक होते. त्यांचे लेखन सामाजिक व राजकीय दृष्ट्या कृतिशिलतेवर आधारीत होते. त्यांच्या साहित्याच्या लिखानावर व विचासरणीवर मार्क्सवादी तसेच साम्यवादी विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे महाराष्ट्राच्या जडण घडणीत व परिवर्तनात फार मोठे योगदान होते. तसेच दलित व कष्टकरी कामगार वर्गाच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभव प्रकार करण्यांसाठी कथांचा वापर करण्यात आला. कॉ. अण्णा भाऊंचे साहित्य कामगार वर्गानी वाचण्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले.

यावेळी श्रमिक भवन ते सारसबाग येथील कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्या पर्यंत मिरवणूकीने जाऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर मिरवणूकीत युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. चंद्रकांत गमरे, कॉ. रमेश पारसे, कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. शोभा बनसोडे, कॉ. दिलीप कांबळे कॉ. करूणा गजधनी, कॉ. प्रमिला वाघमारे, कॉ. धनंजय आयवळे, कॉ. संतोष चव्हाण, कॉ. देवनाथ सद्भैया, कॉ. विजय पवार, कॉ. राजेश पिल्ले, कॉ. ओंकार काळे, कॉ. तानाजी करडे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. प्रदिप इसांबरे, कॉ. मिना खवळे, कॉ. जयश्री भिसे, कॉ. कुंदा कुंबरे, कॉ. रतन धिमधिमे इत्यादी पदाधिकारी व सचिव कार्यकर्ते सहभागी होते.









