पुणे शहर

वारजे माळवाडी ग्रामस्थ, रहिवासी, मित्र मंडळ यांच्या वतीने स्वर्गीय बाबा खान यांना आदरांजली..

वारजे : वारजे ग्रामस्थ , वारजे ग्रामपंचायत सदस्य,  वारजेच्या विकासातील प्रत्येक आंदोलन , मोर्चा यामध्ये सक्रिय सहभाग असणारे स्वर्गीय जावेद ऊर्फ बाबा खान यांना वारजे माळवाडी ग्रामस्थ, रहिवासी मित्र मंडळ यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.  खान यांचे  १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 
    

Img 20240210 wa00263445278441877772425

स्वर्गीय बाबा खान हे वारजेतील  सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांना परिचित आणि हवे हवे अशी वाटणारे सर्व मान्य नेतृत्व होते . वारजे कृती समितीचे ते एक प्रमुख समन्वयक होते . यावेळी वारजे परिसरातील त्यांच्या कार्याचा उहापोह सर्वपक्षीय नेते , कार्यकर्त्यांनी केला.    
     

Img 20240210 wa00275146714396715319360

याप्रसंगी स्वर्गीय बाबा खान यांचे कुटुंबीयांसोबत सुगंधाचार्य हभप दिलीप बराटे , संतसेवक हभप कैलास देवकर , माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भोरकडे , कामगार नेते यशवंत ठोकळ , आखील वारजे माळवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माणिक दुधाने , माजी नगरसेवक बाबा धुमाळ ,  किरण बारटक्के , माजी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट,   संजय भोर ,  दत्ता झंजे , मराठवाडा सेवा संघाचे अध्यक्ष निळकंठ शेळके ,भाजपाचे सुभाष अग्रवाल , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बराटे,  मारुती मोहिते , एस कुमार टेलर , संजय कालेकर , अमित सोंडकर  , संभाजी ब्रिगेडचे राकेश सावंत , ज्ञानेश्वर गोरे , आदी उपस्थित होते.

Img 20230717 wa0012281298961742807603730839
Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये