महाराष्ट्र

राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर धडक देण्याचा हट्ट सोडला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ‘मातोश्री’बाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची भूमिका मागे घेतली आहे. याबाबत रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. देशासाठी काम केलेल्या व्यक्तीला यंदापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी रविवारी मुंबईत दाखल होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याला गालबोट लागू नये किंवा हा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आमची भूमिका मागे घेत आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये