चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दांगट यांच्या वतीने वारजेत विविध उपक्रमांचे आयोजन..

वारजे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस वारजे परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. On the occasion of Chandrakant Patil’s birthday, Sachin Dangat organized various activities in Warje.
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील गरजु व्यक्तींना धान्य वाटप, वारजे वाहतुक विभागातील सर्व पोलीस बांधवांना N 95 मास्क , सॅनिटायजरचे वाटप, जेष्ठ नागरिक आणि महिलांना पुस्तके वाटप असे उपक्रम घेण्यात आले तसेच आंबा , जांभुळ , बदाम आदि झाडांचे वाटप त्याचबरोबर घरेलु कामगार , दिव्यांग , रिक्षाचालक यांना अनुदान अर्जाचे वाटप करण्यात आले .भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी यांच्या वतीने हे उपक्रम घेण्यात आले.

यावेळी पुणे मनपा शिक्षण मंडळ अध्यक्षा, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर , भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शराध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी , ह.भ.प सतीशमामा बोडके,पर्यावरण आघाडीचे खडकवासला अध्यक्ष संजय वाल्हेकर , वारजे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बापु शिंदे, सहकार आघाडी पुणे शहर चिटणीस चुनीलाल शर्मा , बालाजी माने , शंकर राठोड , रेश्मा पाटणकर , आप्पा दांगट , प्रदीप निकम , हेमागिंनी पाटणकर , आनंद देशपांडे , अरविंद खताळ , जितेंद्र परिहार , किरण ऊभे , किरण साबळे , व्यंकटेश दांगट यांचेसह वाहतुक पोलीस कर्मचारी , नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .






