चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

कोथरूड : भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्र १० कोथरूड डेपो- बावधन खुर्द शुभेच्छा मंगल कार्यालय,डावी भुसारी काॅलनी येथे नगरसेविका अल्पना गणेश वरपे आणि भाजपा युवामोर्चा प्रदेश चिटणीस ॲड. गणेश जयवंत वरपे यांच्या वतीने पाटील यांनी सुरू केलेल्या नागरिकांकरिता मोफत लसीकरण व रिक्षाचालकां करिता मोफत CNG गॅस कूपन या उपक्रमाकरिता खारीचा वाटा म्हणून धनादेश चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूपूर्त केला.
तसेच सावली संस्थेतील बहूविकलांग मुलांना फळे,अन्नधान्य,आरोग्य किट व खाऊ वाटप,प्रभागातील हॅास्पीटल व क्लिनीकला डिजिटल वेटमशीन,नागरिकांना आरोग्यमंत्र किट वाटप शुभारंभ,रिक्षाचालकांना अन्नधान्य किट वाटप, नवीन घरेलू कामगार नोंदणी मोहिम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहूणे राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे परमहंसनगराचे संघचालक हिरामण जगताप,संभाजीनगर भाग कार्यवाह सुधीर जवळेकर,परमहंस नगर भागाचे कार्यवाह अमोद कालगावकर,शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे,नगरसेवक दिलीप वेडेपाटील,नगरसेवक किरण दगडेपाटील,नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे-पाठक,नगरसेवक सुशिल मेंगडे,नगरसेवक दिपक पोटे,शहर प्रवक्ते संदिप खर्डेकर,कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनित जोशी,



खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे,स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे,विलास मोहोळ,बाळासाहेब टेमकर,वृक्षसंवर्धन समिती सदस्य सचिन पवार,कोथरूड युवामोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ,राजेश कुलकर्णी,कोथरूड भाजपा महिलामोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे,महिलामोर्चा शहर सरचिटणीस कांचन कुंबरे,प्रभाग अध्यक्ष सागर कडू,कैलास मोहोळ,राजाभाऊ जोरी,कोथरूड महिलामोर्चा पदाधिकारी पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझिरे,विद्या टेमकर,सुहासिनी शिरढोणकर,ज्वाला पवार,गायत्री सणस,अमरजा पटवर्धन,सावली संस्थेतील विद्यार्थी, शिक्षिका व रिक्षाचालक बंधू व नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले व आभार सागर कडू यांनी मानले.



