पुणे शहर

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप सहकार आघाडी पुणे शहराच्या वतीने ५१ समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : pune city महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा सहकार आघाडी पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने विविध ठिकाणी ५१ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजप शहराध्यक्ष जगदीश  मुळीक यांचे नेतृत्वाखाली हे कार्यक्रम घेण्यात आल्याचे भाजप सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दांगट यांनी सांगितले. On the occasion of Devendra Fadnavis’s birthday, BJP Sahakar Aghadi organized 51 social programs on behalf of Pune city

आयोजित करण्यात आलेले समाजोपयोगी कार्यक्रम

सचिन दांगट यांच्या वतीने ५०१ झाडे वाटप संयोजक व  ५०१ झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. चिटणीस छगनलाल मिस्री यांच्या वतीने २५ वृक्षाचे वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला. उपाध्यक्ष सुयोग झेंडे यांच्या वतीने गोशाळेत ५०१ किलो फळफळावळ रूपी चारा आणि वृक्ष वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष संजय जैन वृक्षारोपण करत २५ झाडांचे रोपण केले. उपाध्यक्ष निळकंठ शेळके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात १०० वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले.

उपाध्यक्ष गिरीश घोरपडे यांच्या वतीने गरजूंना ५१ शालेय पुस्तकांचा संच भेट देण्यात आला व  २५ वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.  कुमार शिंदे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनाथाश्रमात अल्पोपहार आणि जाम वाटप करण्या बरोबरच २५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सचिन दांगट यांच्या वतीने लहान मुलांसाठी मोफत डान्स क्लासेस संयोजन करण्यात आले आहे.  सहकार आघाडी पदाधिकारी अक्षयसिंह शितोळे, किशोर चौधरी, बालाजी माने, चिटणीस भगवान शिर्के  यांनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे संयोजन केले.

सरचिटणीस अजित देशपांडे व उपाध्यक्ष जयंत नरूटे  यांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी वृध्दाश्रमात फळेवाटप करून वृक्षारोपन केले.चिटणीस शंकर राठोड यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप , फळे वाटप , वृक्षारोपण असे कार्यक्रम घेण्यात आले. तर चिटणीस चुनीलालजी शर्मा आयोजित कार्यक्रमात मातोश्री वृध्दाश्रमात फळे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.

Img 20210721 wa0161

पोतराज आणि हिंदु नाथपंथीय डवरी,गोसावी समाज वस्तीवर वृक्षारोपण , झाडे वाटप , लहान मुलांना शालेय साहित्य वाटप , आटा पाकीटे वाटप अशा क्रयक्रमाचे आयोजन सचिन दांगट यांनी केले.
उपाध्यक्ष महेंद्र भंडारी यांच्या वतीने वृक्षारोपण , तुळस रोप वाटप , छत्री वाटप करण्यात आले. प्रभारी प्रकाश बालवडकर आयोजित कार्यक्रमात ५१ रिक्षाचालकांना २ लाखाचा अपघाती विमा आणि वृक्षारोपण घेण्यात आले.

Img 20210724 wa0001

अशा एकुण ३६ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन सहकार आघाडीचे वतीने करण्यात आले आहे . उर्वरित कार्यक्रम या सेवा सप्ताहात घेतले जाणार असल्याचे सचिन दांगट यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका अल्पना वरपे , नगरसेवक हरिदास चरवड ,गणेश वरपे , सरचिटणीस युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश , नगरसेवक गंगाधर भडावळे , प्रसन्नजीत फडणवीस , नगरसेवक हरिश्चंद्र दांगट , वृन्दावन अनाथाश्रमाचे विजय देडगे , खजिनदार सुभाष आगरवाल , शालिनी पिडीहा यांचेसह विविध सोसायटीचे पदाधिकारी , विविध शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
  

या कार्यक्रमांशिवाय ५०१ रिक्षाचालकांना २ लाखाचा अपघाती विमा , नोकरी महोस्तव , ५१ मान्यवरांचे सन्मान , १५ दिवसीय फ्री फुट थेरपी कॅम्प , हाडे ठिसुळता प्रमाण तपासणी शिबीर , वृध्दाश्रम / अनाथाश्रम फळे वाटप , सॅनीटायझर , मास्क वाटप , शासकीय कार्यालय औषध फवारणी , झाडे वाटप , वृक्षारोपण या कार्यक्रमांचा सामावेश असलेले ५१ समाजोपयोगी कार्यक्रम सेवा सप्ताहात घेतले जाणार आहेत .

Img 20210724 wa0072

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये