महाराष्ट्र

पूजा चव्हाणच्या आजीने व्यक्त केला शिंदे सरकारविरोधात संताप

मुंबई : “खरं तर एका मुलीची आब्रू काढून गर्भपात करुन तिचा खून केला जातो. स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की हे कर ते कर. एवढं ऐकून सुद्धा संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो. आरती करावी त्याची या (शिंदे-फडणवीस) सरकारने. त्याची पुजा करा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल,” अशा शब्दांत पूजा चव्हाण या तरुणीच्या आजीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांना स्थान दिल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना शांताबाई राठोड म्हणाल्या,“आम्हाला अशी अपेक्षा होती की या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र जो मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला तो पाहून असं वाटत नाही. पक्षाने त्याला वाचवलं आणि (मंत्री म्हणून) स्थान दिलं आहे ही दुर्दैवी बाब आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे.” 

“हा (राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय) महिलांचा अपमानच आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार. तो खूनी आहे खूनीच आहे,” अशी टीकाही शांताबाई यांनी केली.

तुमची मागणी काय आहे? तुम्ही काय करणार आहात? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता शांताबाई यांनी, “पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील,” असं म्हटलं आहे.

Img 20220804 wa0019951227047229036961
Img 20220801 wa0304
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये