पुणे शहर

वारजेत सर्वपित्री अमावास्येनिमित्त सामूहिक पिंडदान विधी अर्थात महालय श्राद्धाचे आयोजन…

वारजे : ज्येष्ठ नागरिक संघ वारजे आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे, संस्कृत संस्कृति संशोधिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावास्येनिमित्त Sarvapitri Amavasya सामूहिक पिंडदान विधी अर्थात महालय श्राद्धाचे आयोजन वारजे येथील गंगाबाई धुमाळ विरंगुळा केंद्रात पार पडला.

ज्ञान प्रबोधिनी तर्फे विद्याश्री पुरंदरे यांनी पौरोहित्यासाठी मार्गदर्शन केले व सदस्यांनी यात सहभाग घेतला.
या उपक्रमात सहभागी होणार्‍या सदस्यांच्या सोयीसाठी सर्वांना पूजा साहित्यही उपलब्ध करून दिले जाते. श्राद्धासाठी आवश्यक सर्व सामग्री दिली जाते व सहभागी सदस्य पिंडदान करतात.

या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून पुरुषांच्या जोडीनेच महिलाही यात सहभागी होतात व आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी विधीपूर्वक पिंडदान करतात. या कार्यक्रमासाठी सुनील वावीकर, ए.एस.कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, मोहिते, जाचक, कृष्ण चव्हाण, अंजली देशपांडे, उदय कुलकर्णी, चित्रे,घटवाई, आर्या जोशी, क्षीरसागर सभासदांनी विषेश परिश्रम घेतले.

ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजे, पुणे या संस्थेने सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सर्व लोकांसाठी सामुदायिकपणे पिंडदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. वारजे येथील श्रीमती गंगाबाई धुमाळ विरंगुळा केंद्राच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सर्व कार्यक्रमाचे संचलन व पौरोहित्य ज्ञानप्रबोधिनीच्या विद्याताई पुरंदरे व आर्या जोशी यांनी केले. या उपक्रमाला प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डी. के. जोशी यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजेच्या वतीने हा चांगला उपक्रम राबवला जात असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.

Img 20240404 wa0016281291197243699799508498

सर्वपित्री अमावास्या
लौकीक अर्थाने वर्षाच्या बारा अमावस्या पैकीं ही अमावस्या निराळी. ह्या अमावस्येला आपल्या सर्व पितरांचे आपल्या कृतज्ञ भावनेने, केलेले हे कृतार्थ स्मरण असते. भारतीय संस्कृती मध्ये ऋण स्मरणाला विशेष महत्व आहे. प्रत्येक भारतीय आज आपल्या तीन पिढ्याचे काशी, गया, मथुरा, अयोध्या, वाराणसी, कुरुक्षेत्र, त्रंबकेश्वर, इ. इ. जाऊन पिंडदान करत असतो. ह्या मध्ये विनम्रपणे केलेले कृतार्थ जीवनाचे, ते कृतज्ञ पुण्यस्मरण असते. ह्या मध्ये जी मंडळी कालवश झालेली आहेत, ती सर्व मंडळी येतात. पितृव्य पितर, मातृव्य पितर, व श्वसुरव्य पितर ह्या तीन घराण्याच्या तीन पिढ्या तर येतातच., पण त्याज बरोबर, आपल्या संबंधित, आपल्या कुटुंबाच्या संबंधित, जो जो सेवक वर्ग घरात, व्यवसायात सहाय्यभूत होत आला आहे त्यांचे ही कृतज्ञ बुद्धीने स्मरण केले जाते. इतकेच नव्हे तर जी जी व्यक्ती, नातेवाईक, मित्र परिवार, गुरु परंपरा, म्हणजेच गुरु, परमगुरु, परमेष्टीगुरु, परात्परगुरु, त्याच बरोबर दिवंगत गुरुबंधू, गुरुभगिनीं हया ही मंडळींचा ह्या मध्ये विचार होतो. ज्या घरात महालय श्राद्ध आपल्या कुलोपाध्यायाच्या मार्गदर्शनां खाली केले जाते, तिथे ह्या सर्व गोष्टी आज ही क्रमवार पद्धतीने उच्चारल्या जातात. भारतीय संमृद्ध विचारधारेचा हा संमृद्ध वारसा आहे. अत्यंत सुंदर पणे ही विचारांची गुंफण समाजमनात रूजविली गेली आहे. गेली हजारो वर्षे आम्ही भारतीय ह्या परंपरा अभिमानाने जपत आलो आहोत. आज आपण जिथे असू, जसे असू तसे, माध्यान्हकाली अत्यन्त विनयाने, कृतज्ञ बुद्धीने हे स्मरण केले असेल.
        

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये