पुण्यात मैदानी खेळाडूना स्टेरोइड उत्तेजक मादक पदार्थ मेडिसीन व बंदी असणारी मेडिसीनची ऑनलाईन विक्री; कारवाई करण्याची कुस्ती मल्लविद्या महासंघाची मागणी
पुणे : पुण्यात मैदानी खेळाडूना स्टेरोइड उत्तेजक मादक पदार्थ मेडिसिन व बंदी असणारी मेडिसिन चुकीची माहिती देऊन ऑनलइन विक्रि जोमात सुरू असून या गैर प्रकाराकडे अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. खेळाडूना डोपिंगसाठी मेडिसिन विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर आणि भेसळयुक्त प्रोटीन विक्रेत्यावर करवाई करा अशी मागणी कुस्ती मल्लविद्या महासंघ तांत्रिक समिती पुणे शहर अध्यक्ष निकुंज दत्तात्रय उभे यांनी केली आहे.
उभे म्हणाले, अन्न व औषध प्रशासन ,पुणे सह आयुक्त गिरीश हुकरे यांची डोपिंगच्या अनुषंगाने भेट घेऊन खेळाडूंच्या डोपिंग निगडित अनधिकृत मेडिसिन विक्री करणाऱ्या औषध विक्रेते/डीलर तसेच भेसळयुक्त प्रोटीन विक्रेत्यावर कायदेशीररित्या दिलेल्या अटी शर्तीच पालन करण्यास निर्बंध घालावे अन्यथा अश्या डोपिंगसाठी विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर कड़क स्वरुपाची करवाई व्हावी अशी विनंती चर्चा करुण कुस्ती मल्ल विद्या पुणे शहर महासंघाच्या वतीने निवेदन पत्र देण्यात आले.