पुणे शहर
शिवप्रताप प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : शिवप्रताप प्रतिष्ठान कोथरूड आयोजित महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर शिवचैतन्य सभागृह येथे झाले. यावेळी ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच महाराजांना पुष्पहार व दीपप्रज्वलन मा.नगरसेवक माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक समीर पाटील, बाप्पूशेठ वाघमारे यांच्या उपस्थित झाले.
मान्यवरांनी रक्तदात्यांचे स्वागत व आभार मानले, सर्वांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
यावेळी काही महिलांनी रक्तदान केले सूत्र संचालन चंद्रकांत शिंदे यांनी केले, सर्वांचे आभार दत्ता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल शिंदे यांनी केले होते.




