अर्थजगत
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या अच्छे दिनच्या चांगल्याच झळा बसू लागल्या आहेत. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून लगेचच इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी आज पून्हा पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर मागे 80 पैशांची वाढ केलेली आहे. तर, मुंबईत इंधन दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर तब्बल 111.67 रुपये प्रति लिटर झाला आहे.
मुंबईत डिझेल 95.85 रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे. देशभरात इंधनदरात प्रतिलिटर 15 ते 20 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या वाढत्या महागाईचा मुकाबला कसा करायचा याची चिंता सतावत आहे.




