पुणे शहर

समाजासाठी कायम झटणाऱ्या नेत्याला रक्तदानासारख्या सामजिक उपक्रमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा…

कर्वेनगरमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोद शिंदे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

कर्वेनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्वेनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद शिंदे यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्वेनगर वारजे जकात नका येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उत्स्फूर्तपणे तरुणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला वर्गानेही मोठ्या संख्येने यावेळी रक्तदान  केले. स्पंदन ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी केक कापून शरद पवार साहेब यांना कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Img 20241212 wa02361076435602825781581
Img 20240404 wa00142747383113629703933

यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, कोथरूड मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, कोथरूड मतदार संघाचे युवक अध्यक्ष गिरीश गुरुनानी,  प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन फोलाने, राहुल खंदारे, वैभव कोठुळे, विनायक देशमुख, किशोर शेडगे, अमित गोडांबे, अमित सोंडकर, अतुल खसे, महेश कन्हेरकर,  सारंग कोळेकर, पंकज खटाणे, मुकुंद पायगुडे, महेश शेडगे, राम सरोदे, लखन लोखंडे, वसंत रावळे, अनिल राठोड आदी उपस्थित होते.

प्रमोद शिंदे म्हणाले, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक जणांनी आज रक्तदान करत समाजाप्रती असणारे आपले कर्तव्य बजावले. पवार साहेब यांनी कायमच समाजाच्या हिताचा विचार केला. दूरदृष्टी ठेवून त्यांनी देशाच्या, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. म्हणूनच समाजासाठी कायम झटणाऱ्या या नेत्याला आज रक्तदानासारख्या सामजिक उपक्रमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Img 20241212 wa02656031128961938253413
Img 20241212 wa0259766505875231742607
Img 20241020 wa00013699867278209296534
Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये