एरंडवण्यातील वकीलनगर सोसायटी परिसरात आठ दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी, नागरिकांच्या आरोग्याला धोका; महापालिका कधी दखल घेणार?

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून एरंडवणे मधील दिनानाथ मंगेशकर रुग्णालया जवळील वकीलनगर सोसायटी बाहेरील ड्रेनेज लाईन फुटल्याने सोसायटी परिसरात ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली असून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
याबाबतीत स्थानिक नागरिकांनी वारंवार पुणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून पाठपुरावा केला मात्र पालिका प्रशासनाच्या वतीने याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. या पावसाच्या पाण्यामध्ये गटाराचे पाणी मिसळत असल्याने या परिसरात आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तरी पालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिक अजय आडकर म्हणाले, वकील नगर एरंडवणे येथे बाहेरील रस्त्यावरील सामायिक गटार पाईपलाईन फुटल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात घाण पाणी गळती चालू आहे.दुर्गंधी पसरली आहे.. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवला आहे. पालिकेने युद्ध पातळीवर काम करून नागरिकांची समस्या सोडवावी.

























