राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने “एक राखी दिव्यांग बांधवांसाठी” कार्यक्रमाचे आयोजन ; अंध मुलींकडून शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांना औक्षण

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने “रक्षाबंधन” सणा निमित्त “एक राखी दिव्यांग बांधवांसाठी” कार्यक्रमाचे गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे आयोजन करण्यात आले होते.
“नॅशनल असोसिएशन वेलफेअर फिजिकली चॅलेंज” व स्नेहांकित संस्थेतील सर्व अंध मुलं-मुली यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. नॅशनल असोसिएशन वेलफेअर फिजिकली चॅलेंजच्या मुलांच्या गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
भावा- बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त सर्व उपस्थित अंध मुलींनी शहराध्यक्ष दीपक मानकर व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे औक्षण करून,पेढा भरवत,राखी बांधत प्रेमाचे नाते अधिक दृढ केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला पदाधिकारी यांनी आलेल्या नॅशनल असोसिएशन वेलफेअर फिजिकली चॅलेंज संस्थेतील सर्व आमंत्रित अंध भावांच्या मनगटावर औक्षण करून राखी बांधून भावा प्रती असलेले प्रेम व्यक्त केले.













