वारजे पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हळदी-कुंकू कार्यक्रम व पोलीस बांधवांचा सन्मान सोहळा..

कर्वेनगर : pune city राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष नंदिनी पानेकर यांच्या वतीने वारजे पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हळदी-कुंकू कार्यक्रम व पोलीस बांधवांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कर्वेनगर हा परिसर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी व विविध कोर्सेससाठी अग्रेसर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यातील व परराज्यातील मुली या भागात वास्तव्यास आहेत. येथे मोठ्या प्रमाणात गर्ल्स हॉस्टेल्स, महिला खानावळ आहेत, त्यामुळे परिसरात नेहमीच महिला छेड-छाडीचे प्रकार घडत असतात, पोलिसांकडे याबाबत सारख्या तक्रारी होत असतात. परंतु याबाबत स्थानिक महिला रहिवासी व महिला प्रतिनिधी म्हणून पोलीस प्रशासनाला आमची मदत होणार असेल तर आम्ही महिला जरूर प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी पानेकर यांनी पोलिसांना दिले.
विशेष सहकार्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास खटके यांचे पानेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ज्योती सूर्यवंशी, संगीता मोहोळ, आश्विनी माने, दिपा मोहिते, प्रेमलता जैन, मीना मोरे व पदाधिकारी उपस्थित होते .




