प्रशांत दामले यांनी मांडली आपली व्यथा ; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

पुणे :- मराठी नाटकांमधून,मराठी चित्रपटांमधून, टीव्ही कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले हे सोशल मीडियावर देखील त्यांचे मत मांडत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे व त्यातून आपली व्यथा मांडली आहे.
व्यथा सांगताना दामले म्हणतात, नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारणं, तुमच्या सुचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधने कधी संपतील असं झालंय. सगळं पूर्ववत होऊ दे रे बाबा लवकर.’ असे त्यांनी म्हंटले आहे.
त्यांच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी सुद्धा होकारार्थी कमेंट केल्या आहेत. आम्ही सुद्धा या सर्व गोष्टी मिस करतो असे त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स मध्ये सांगितले आहे. सध्या प्रशांत दामले हे किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत.




