पुणे शहर

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त बसव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध विधायक उपक्रमांचे आयोजन..

सिंहगड रोड : येथील बसव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने समतानायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त रक्तदान, नेत्रतपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. वडगाव बुद्रुक येथील जैन मंदिरात संपन्न झालेल्या या शिबिरादरम्यान माजी नगरसेवक हरिदास चरवड, विकास दांगट-पाटील, नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते, शरद दबडे, बाळासाहेब जाधव, केदार जाधव चंद्रकांत उभे-पाटील उपस्थित होते.

या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर ९७ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्रतपासणी केलेल्या ७६ गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच २२ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी करण्यात आली. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल आसरा अनाथ आश्रमाच्या संचालिका स्वाती डिंबळे यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्राध्यापिका डॉ. नलिनी अविनाश वाघमारे यांनी “महात्मा बसवेश्वर यांचे स्त्री उद्धारक कार्य” या विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरण नरसिंह मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन शरण चंद्रकांत हरकुडे यांनी केले. बाल शरणांनी व महिला भगिनींनी महात्मा बसवेश्वर यांच्या वचनांचे गायन करून उपस्थितांची मने जिंकली. शरण संजय शेंडे, शरण सतीश पाटील व सहकारी यांच्या महामंगलने कार्यक्रमाची सांगता झाली. आरोग्य शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ कात्रज व श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Img 20220425 wa00101037196448559324394 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये