करोना च्या नावाखाली इतर रुग्णांकडे दुर्लक्ष
डोक्यात बेरोजगारीचे टेंशन, वडिलांच्या आजारपणाचा खर्च चालू, कोरोना मुळे उत्पन्नाचं साधन नाही यामुळे खचलेल्या एका तरुणाला हृदय विकाराचा त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रुग्णालय प्रशासनाने कोरोना व अनामत रकमेच्या नावाखाली उपचारासाठी उशीर केल्याने तरुणाला प्राण गमवावे लागले. कोरोणा काळात इतर रुग्णांना दाखल करून घेताना रुग्णालय प्रशासन उशीर करत आहे. अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून शासकीय पातळीवर योग्य नियमावली बनविले जाणे आवश्यक बनले आहे.
या घटनेनंतर मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न सोशल माध्यमांवर विचारला जाऊ लागला आहे. कर्वेनगर परिसरात राहणारा हा तरुण फिट आल्यासारखे झाल्याने घरात जमिनीवर कोसळला. शेजारच्या मित्रांनी तातडीने त्याला कारमधून वारजे येथील एका नामवंत खाजगी रुग्णालयात नेले. या रुग्णालयामध्ये प्रथमतः त्याला कोरोनाच्या कारणामुळे इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करताना विनाकारण फार वेळ गेला. इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर त्याचा बीपी चेक केला. तरुणाला मागील महिन्यांमध्ये देखील असाच त्रास झाला होता. त्याच्या मित्रास डॉक्टरांनी मागील महिन्यात दिलेल्या उपचाराची फाईल आणण्यास सांगितले त्यातही वेळ गेला कोणत्याही उपचाराविना साधारणता या सर्व गोष्टीला ३० ते ४० मिनिट वेळ गेला होता. ह्या सर्व प्रक्रियेत अमूल्य वेळ गेल्यानंतर डॉक्टरांनी कोरोनाचे कारण देत व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याचे सांगून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले.सोबत असलेल्या मित्राने काहीही विचार न करता त्याला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटल मध्ये नेले तेथे दाखल करण्याच्या अगोदर हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने मित्रास ४९ हजार रुपये डिपॉझिट करण्यास सांगितले. मित्राने सांगितले की दहा हजार रुपये आहेत ते डिपॉझिट आता करतो बाकीचे पैसे नंतर देतो अशी विनंती मॅनेजमेंटला केली या सर्व गोष्टीत हि आर्धा तास वेळ गेला खूप विनवण्या केल्यानंतर तरुणाला दाखल करून घेण्यात आले. तपासणी केल्यानंतर तरुणाचा ४५ मिनिटापूर्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या तरुणाला वेळेत दाखल करून त्याच्यावर उपचार झाले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते.
या प्रकाराला जबाबदार कोण असा संदेश आता व्हॉट्स अप वरती फिरत आहे. करोनाच्या नावाखाली मनमानी कारभार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवरती कोण अंकुश ठेवणार, हॉस्पिटल चालवणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रश्न कोण विचारणार, खरंच ह्या घटनेला कोरोना, अकार्यक्षम प्रशासन, की पालिकेच्या आरोग्य विभागाचा नियोजन शून्य कारभार,की मनमानी कारभार करणारे हॉस्पिटल्स या पैकी कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.