कोथरुड
कर्वेनगर मधील वनदेवी टेकडीवर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

कर्वेनगर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्वेनगर येथील वनदेवी टेकडीवर चेतन भालेकर मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी देशी व औषधी झाडे टेकडीवर लावण्यात आली. Tree planting on Vandevi Hill in Karvenagar on the occasion of World Environment Day.
या प्रसंगी चेतन भालेकर, प्रतीक नलावडे, अमित शिंदे, डी.पी. शिंदे, कांबळे मामा, प्रथमेश भालेकर, ओंकार मते, ओहोळ बंधु उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चेतन भालेकर यांनी होते. यावेळी आवळा, वड, पिंपळ अशी झाडे लावण्यात आली.

केवळ झाडे लावून चालणार नाही तर पर्यावरण रक्षणासाठी लावलेल्या झाडांचे संगोपन होणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळी लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली.



