पुणे महापालिकेने मालमत्ता करात ५०% सवलत द्यावी.

पुणे : एका असाधारण परिस्थितीतून आज देश मार्गक्रमण करीत आहे. करोनाच्या महामारीने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड आर्थिक विवंचना भासते आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पुणे महापालिकेने मालमत्ता करामध्ये ५० % सवलत देण्यात यावी.अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे केली आहे.
नरेंद्र मोदी सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने अद्याप पॅकेज दिले नाही. आपण मालमत्ता कर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्यादृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. स्तुत्य उपक्रम आहे. सध्याच्या परिस्थितीत MMC Act कलम 133 A मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून पुणेकर नागरिक, व्यावसायिक दुकानदार, आणि इतर लोकांचा मालमत्ता कर 50% कमी करावा. अशी मागणी निवेदनात केली आहे.

अशी सवलत देणारी पुणे मनपा ही पहिली मनपा असेल,यात कमी होणारे नुकसान राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून 25% प्रत्येकी मिळवून घेता येईल. पुणेकर नागरिकांनी आपल्या पक्षावर विश्वास दर्शविला आहे,खासदार, आमदार, नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. त्यांना दिलासा दिला पाहिजे असे वाटते. याकामी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळू शकते कारण त्यांचेही नगरसेवक मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिकांनी निवडून दिले आहेत. तसेच दोन आमदारही निवडून आले आहेत.
आमच्या या प्रस्तावित योजनेचा विचार करून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी असे केसकर आणि कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे.



