राष्ट्रीय

पॅरासिटामॉलसह अत्यावश्यक औषधे 1 एप्रिलपासून महागणार, किमती 10.7 टक्क्यांनी वाढणार

पुणे : कोरोना साथीच्या आजाराच्या कठीण काळातून बाहेर पडल्यानंतर आता सर्वसामान्यांना महागड्या औषधांचा फटका बसणार आहे. 1 एप्रिलपासून पॅरासिटामॉलसह 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाने शुक्रवारी या वर्षीच्या घाऊक किंमत निर्देशांकात (WPI) मागील वर्षाच्या तुलनेत 10.7 टक्के बदल जाहीर केला. याचा अर्थ सामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट असलेल्या जवळपास 800 औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत.

ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचाविकार आणि अशक्तपणा यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यामध्ये पॅरासिटामॉल, फेनोबार्बिटोन, फेनिटोइन सोडियम, अजिथ्रोमाइसिन, सिप्रोफ्लोक्सासिन हायड्रोक्लोराइड आणि मेट्रोनिडाझोल यांसारख्या औषधांचा समावेश आहे. एकीकडे औषधांच्या किमतीत वाढ होणार असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती रोज वाढताना दिसत आहेत. बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने यापूर्वीच शंभरी पार केली आहे. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांत खाद्यपदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये