पुणे शहर

रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर प्रभागाच्या विकासासाठी पक्षाची भूमिका, आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा- हर्षवर्धन दीपक मानकर

प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार  हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या प्रचारार्थ सभा 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रचार सभा त्रिमूर्ती मित्र मंडळ, जयभवानीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

 या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर जनसमुदायाने फुलून गेला होता. पक्षाचे अधिकृत उमेदवार  हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे हे गेल्या १०-१२ दिवसांपासून मोठ्या दिमाखात आणि जोशात प्रचार करत आहेत. प्रभागातील प्रमुख भागांमध्ये घरोघरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पोहचविण्याचे त्यांनी काम केले.   

Img 20251125 wa01782121520512185783132

या वेळी उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रभागाच्या विकासासाठी पक्षाची भूमिका, आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा तसेच पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य व रोजगार या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर आपली भूमिका मांडली. तसेच मागील ७-८ वर्षांपासून प्रभागात केलेली विकासकामे, नागरिकांसाठी दिलेली तत्पर सेवा, नागरिकांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करणे आणि उद्भवणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून त्यांचे निराकरण करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे.

माजी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, “पुणे शहराला पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी नागरिकांनी परिवर्तनाला साथ द्यावी.” प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच उमेदवार कटिबद्ध असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना ते नेहमी प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काम करणारे उमेदवार हर्षवर्धन मानकर,तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांच्या घड्याळ्यासमोरील बटण दाबून सर्व पनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहनही केले.

या प्रचार सांगता सभेला पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला, तरुण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये